Type Here to Get Search Results !

म्हसवड पोलिसांनी आवळल्या वाळू माफियांच्या मुसक्या

 म्हसवड  पोलिसांनी आवळल्या वाळू माफियांच्या मुसक्या  


अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्याला ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह घेतले ताब्यात

 

तब्बल 7 लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

 सातारा - म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीपात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची माहिती सपोनी अक्षय सोनवणे यांना मिळाले नंतर त्यांच्या सह पथकाने छापा टाकून  ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता म्हसवड, शिरताव, पूळकोटी अशा बाजूने जात असताना शिरताव ते पूळकोटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावचे पूलाजवळ सुरज महादेव गोरवे याचे सह एक लाल रंगाचा ट्रॅक्टर, वाळू सह ट्रॉली असा एकूण 7 लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मानगंगा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करत असलेली माहिती म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाल्यानंतर अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने अवैध वाळू चोरून वाहतूक करणाऱ्या सुरज महादेव गोरवे या इसमास पाठलाग करीत बनगरवाडी गावचे पुलाजवळ पकडून त्याच्या कडून ट्रॅक्टर तसेच वाळूसह ट्रॉली असा एकूण 7 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात सुरज महादेव गोरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.

         सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, अनिल वाघमोडे, संतोष काळे, योगेश सूर्यवंशी,भास्कर गोडसे, राहुल थोरात, विनोद सपकाळ यांनी केली.

         न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 



Post a Comment

0 Comments