Type Here to Get Search Results !

अपशिंगे येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 1857 लाभार्थ्यांना थेट सेवा


अपशिंगे येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

               1857 लाभार्थ्यांना थेट सेवा 

वेणेगाव - अपशिंगे (ता. सातारा) येथील असेम्बली हॉल या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाने तसेच उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अपशिंगे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर यशस्वीपणे पार पडले.या उपक्रमात 1857 नागरिकांना थेट सेवा व योजनांचा लाभ मिळाला.कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे, उपविभागीय अधिकारी श्री. आशिष बारकुल, तहसीलदार श्री. समीर यादव यांची उपस्थिती लाभली.

               या वेळी शिबिरातील उपस्थितांना संबोधित करताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले "गावपातळीवर योजनांचा थेट लाभ देणं हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचं बळकटीकरण आहे. या शिबिरातून अनेकांना सेवा मिळाल्या, हे पाहून समाधान वाटते. अपशिंगेकरांचा तसेच मंडलातील नागरिकांचा प्रतिसाद आणि अधिकारी वर्गाचे योगदान प्रशंसनीय आहे."

             "शासनाचे विविध विभाग एकत्र येऊन लोकांना सेवा देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. अशा शिबिरांमुळे प्रशासन-जनता संवाद सशक्त होतो."असे मत उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. 

             दरम्यान तहसीलदार समीर यादव पुढे बोलताना म्हणाले "गावातच दस्तऐवज व योजना उपलब्ध झाल्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्च वाचला. हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावा लागेल."

 शिबिरातील प्रमुख सेवा:

महसूल व पुरवठा विभाग: 619 प्रकरणे

आरोग्य सेवा: 218 लाभार्थी

डोळ्यांचे शिबिर (बुधराणी हॉस्पिटल): 834 लाभार्थी

आधार कार्ड अपडेट: 53

पीएम किसान योजना: 56 प्रकरणे

ग्रामपंचायत दाखले: 72

महिला बचत गट उत्पादन विक्री: ₹9500

           या उपक्रमाचे आयोजन अपशिंगे मंडल अधिकारी राजेंद्र लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपशिंगे येथील सरपंच तुषार निकम यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ सागर लेंभे व ग्राम महसूल अधिकारी राणी जाधव यांनी केले.

            या  कार्यक्रमासाठी ग्राम महसूल अधिकारी तेजश्री वारके, प्रतीक्षा गायकवाड, नीलम कणसे, शीतल कांबळे, उमेश पाटणकर, सुनील पाटील, राणी जाधव व महसूल सेवक, पोलीस पाटील, महिला बचत गट व महा ई सेवा केंद्र चालक प्रमोद पंचपोर व प्रसाद जाधव यांनी योगदान दिले.

🖋 संपादकीय टिपण:

शासनाच्या योजनांना गती देण्यासाठी अशा महसूल समाधान शिबिरांची आवश्यकता आहे. अपशिंगे येथील यशस्वी आयोजन हे "प्रशासन जनतेच्या दारी" या संकल्पनेचा आदर्श नमुना आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांचं समन्वयपूर्ण कार्य हे इतर गावांसाठी प्रेरणादायक ठरेल.

या शिबिरात उपस्थित नागरिकांच्या प्रतिक्रिया:

"शासनाचे अधिकारी थेट गावात येतात ही बाब कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांनी खऱ्या अर्थाने बदल घडतो."

– विनायक निकम, अपशिंगे

"महिला बचत गटासाठी विक्रीची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आमचं मनोबल वाढलं."

– प्रियांका देशमुख, बचत गट सदस्य

उपस्थित नागरिकांना मनोगत व्यक्त करताना आमदार मनोज दादा घोरपडे व उपस्थित महसूल अधिकारी




Post a Comment

0 Comments