Type Here to Get Search Results !

कामेरीत राज्यस्तरीय परीक्षण समितीचे जल्लोषपूर्ण स्वागत — गावाच्या प्रगतीचा अभिमानाने झाला गौरव

 कामेरीत राज्यस्तरीय परीक्षण समितीचे जल्लोषपूर्ण स्वागत — गावाच्या प्रगतीचा अभिमानाने झाला गौरव

वेणेगाव (प्रमोद पंचपोर)

प्रतिनिधी -  कामेरी (ता. सातारा) येथे आज राज्यस्तरीय परीक्षण समितीच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपजिल्हाधिकारी, बीडीओ, आरटीओ अधिकारी आणि सेल टॅक्स विभागातील प्रशिक्षणार्थी अधिकारी अशा मान्यवरांनी सजलेल्या या समितीचे स्वागत ग्रामपंचायत, ग्रामस्थ, महिला मंडळ, आजी–माजी सदस्य व विविध सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत पार पडले.

गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने समिती सदस्यांचे स्वागत करताना एकजूट, शिस्त व गावविकासाबद्दलची बांधिलकी याचा प्रभावी परिचय घडवून आणला. गावविकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, कामेरी हायस्कूलचे समर्पित शिक्षक व हरिभक्त पारायण मंडळाचे कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गेल्या काही वर्षांत कामेरीने गावविकासाची नवी उंची गाठत जिल्हा ते राज्य स्तरावर उल्लेखनीय छाप पाडली आहे. गावस्पर्धेसाठी निवड मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी दाखवलेल्या टीमवर्कचे समिती सदस्यांनी विशेष कौतुक केले. “गावाने उभा केलेला विकासाचा डोंगर आणि एकोप्याची ताकद हीच कामेरीची खरी ओळख,” असे ग्रामस्थांनी नमूद केले.

गावच्या सरपंच सौ. शुभांगी घाडगे, उपसरपंच राजेंद्र घाडगे तसेच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कामेरी निश्चितच गावस्पर्धेतील बक्षीस खेचून आणेल, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला.

कामेरी आज प्रगती, एकता आणि सकारात्मक बदलाचे तेजस्वी उदाहरण म्हणून उभे राहत आहे.



Post a Comment

0 Comments