ट्रॅक्टरची फणपाळी चोरणारा चोरटा 24 तासात जेरबंद
बोरगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
वेणेगाव - ट्रॅक्टरची लोखंडी फणपाळी चोरणारा धनराज शरद जगदाळे वय वर्ष 20 राहणार नांदगाव ता. सातारा चोरटा बोरगाव पोलिसांनी 24 तासात 7,40,000 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद केल्याने सर्वत्र बोरगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.
बोरगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दि. 4 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान फत्त्यापूर ता. सातारा येथील तक्रारदार यांच्या राहत्या घराशेजारी मोकळ्या जागेत लावलेली ट्रॅक्टरची लोखंडी फणपाळी 40,000 रु किंमतीची असलेली ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाणे 18 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता.या अनुषंगाने बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस चोरट्याचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डीबी पथकातील पो.ना.प्रशांत चव्हाण तसेच पो. कॉ. अतुल कणसे यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-DA-9615 हा संशयितरित्या नांदगाव परिसरात वावरताना दिसल्याचे सांगितले. त्यावरून डीबी पथकाने ट्रॅक्टरचा शोध घेऊन ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता. सदरची फणपाळी मीच चोरून आणल्याचे सांगून गुन्ह्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर तसेच चोरून आणलेली फणपाळी असे दोन्ही रु.7,40,000 मुद्देमालासह ताब्यात घेऊन 24 तासात आरोपीला अटक केली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे तसेच डीबी पथकाचे बोरगाव स्टेशनच्या परिसरातून कौतुक होत आहे.
प्रमोद पंचपोर सह न्यूज24जनसेवक

Post a Comment
0 Comments