फत्त्यापूर चे सरपंच अमोल घाडगे यांना ग्लोबल लिडरशिप अवॉर्डने केले सन्मानित
वेणेगाव - सन्मान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दूत संघटना व भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून फत्त्यापूर ता. सातारा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अमोल नानासो घाडगे यांना ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
अमोल घाडगे यांच्या आज पर्यंतच्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा मानाचा ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड २०२४ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले, या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे, राष्ट्रिय अध्यक्ष अफसर कुरेशी स्थानिक आमदार हरून खान,ए.सी.पी. मुंबई पोलिस श्रीमती सुरेखा कपिले, बॉलिवूड सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी, मिस इंडिया पिया रॉय,महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सौ. प्रिती वनगे - पवार, WHRAF चे मुंबई सचिव महेश आंब्रे यांचेसह ईतर मान्यवर उपस्थित होते.
अमोल घाडगे यांना अवॉर्ड मिळाल्याबद्दल कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज दादा घोरपडे तसेच ग्रामपंचायत फत्त्यापूर व विकास सेवा सोसायटी तसेच पंचक्रोशी मधून अभिनंदन होत आहे.
न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments