Type Here to Get Search Results !

कराड चे कृषी प्रदर्शन राज्यासाठी आदर्शवत - आ. मनोज दादा घोरपडे

 प्रमोद पंचपोर - 18 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यांची आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने मा. मंत्री कै. विलासकाका पाटील उंडाळकर यांनी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली 

          या कृषी प्रदर्शनाचे 19 वे उद्घाटन  सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खा. नितीन पाटील यांच्या हस्ते झाले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज दादा घोरपडे हे होते.या वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍड . उदयसिंह पाटील – उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक विजयकुमार कदम, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, जे. बी. लावंड, गणपत पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, दिनकर बोर्डे, सहाय्यक उपनिबंधक संजय जाधव, मनोहर शिंदे, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, फलटणच्या यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव, स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

 या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे म्हणाले , कराडला भरत असलेले  कृषी प्रदर्शन राज्यासाठी आदर्शवत आहे. शेतीमध्ये होणारे बदल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने  शेतकऱ्यांसाठी  या मध्ये नव्या नोकरी व व्यवसायाच्या संधी आहेत. प्रदर्शनातून प्रत्येकाला तसेच शेतकऱ्यांना नवे ज्ञान मिळते. चांगल्या विचाराकडे तालुक्यातील संस्था असल्याने शेतकऱ्यांचे हक्क अबाधित आहेत.

            या कार्यक्रमाचे प्रकाश पाटील, संभाजी काकडे, विजयकुमार कदम, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, जे. बी. लावंड, गणपत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी काकडे यांनी आभार मानले


Post a Comment

0 Comments