प्रमोद पंचपोर - अखिल भारतीय महा सेवा केंद्र चालक तसेच आधार केंद्रचालक यांचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी शिर्डी येथे होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणीने पत्रकाद्वारे दिली. नुकतीच अखिल भारतीय महा सेवा केंद्राची राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली असून ही संघटना महा-ई-सेवा केंद्र चालकांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याचे काम करणार आहे. यासाठी स्थानिक, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय येणाऱ्या अडचणीवर विचार विनिमय करण्यासाठी दि. 8 डिसेंबर रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन आयोजित केले असून यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व महा सेवा केंद्र चालक तसेच आधार केंद्र चालक यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष समाधान माने यांनी केले आहे

Post a Comment
0 Comments