Type Here to Get Search Results !

सात दुचाकी चोरणारे अट्टल चोरटे बोरगाव पोलीसांनी केले जेरबंद

 

*सात दुचाकी चोरणारे अट्टल चोरटे बोरगाव पोलीसांनी केले जेरबंद*
*गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई*

वेणेगाव – बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  सात  दुचाकी चोरणारे संभाजी बबन जाधव वय ४१ रा.अतित व दिपक उर्फ गोट्या तानाजी मोहिते वय ३४ रा.नागठाणे या  दोन अट्टल चोरट्यांना सात दुचाकी  एकूण 4,95,000 हजार रुपयांच्या  दुचाकी सह  बोरगाव पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडाकेबाज कारवाई  करून दोन जणांना जेरबंद केले.

       बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी नागठाणे ता.सातारा गावचे हद्दीतून एक हिरो कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच 11 सी ई - 4187 ही चोरीस गेल्या बाबतचा गुन्हा दाखल झाला होता. बोरगावचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे  यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पो. कॉ. अतुल कणसे यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. सूचनेच्या  अनुषंगाने गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीस गेलेली दुचाकी दोन इसम साताराहून अतीत येथे येत आहेत.त्यानुसार डिबी  पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पो. कॉ. अतुल कणसे यांनी सदर ठिकाणी जाऊन अतीत गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणाऱ्या हायवेचे बाजूस असलेल्या सर्विस रस्त्यावर पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार हे एक हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वर बसलेले दिसले. त्यांना थांबवून त्यांच्याकडे सदर दुचाकी व तिची कागदपत्रे बाबत विचारणा केली असता उडवाउडवी ची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल नागठाणे ता. सातारा गावचे हद्दीतून चोरली असून अजून सहा दुचाकी कोल्हापूर व सातारा परिसरातून चोरलेल्या आहेत असे सांगितले सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे दोन स्प्लेंडर, हिरो होंडा कंपनीची एक फॅशन प्रो, एक ड्रीम युगा, बजाज कंपनीची एक सिटी हंड्रेड, सुझुकी कंपनीची एक जिक्सर मिळून आल्या. सदर वाहनांचा पंचनामा करून सर्व सात दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपी यांना गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

       केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे डीबी पथकाचे  तसेच बोरगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

                   न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 



Post a Comment

0 Comments