Type Here to Get Search Results !

पत्रकार दिनाचे औचित्त साधून पुरस्कार व मान्यवरांचा सन्मान सोहळा नागठाणे भाग पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम


*पत्रकार दिनाचे औचित्त साधून पुरस्कार व मान्यवरांचा सन्मान सोहळा*

*नागठाणे भाग पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम*

 वेणेगाव - बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. या निमित्ताने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून नागठाणे भाग पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी संघाच्या सन 2025 दिनदर्शिकेचे  प्रकाशन समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांचा सन्मान सोहळा नागठाणे महाविद्यालयच्या प्रगणात साजरा सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

        कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी श्री.छ. खा.उदयनराजे भोसले,श्री. छ. ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोज दादा घोरपडे,ना. महेश शिंदे, मा.खा. श्रीनिवास पाटील, मा. आ. बाळासाहेब पाटील, मा. मंत्री आनंदराव पाटील,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष धर्यशील कदम,शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

         या वर्षीचे दिले जाणारे पुरस्कार नागठाणे भाग पत्रकार संघाच्या वतीने संतोष भोसले पाटील यांना उद्योग रत्न, गुरुदास आडागळे यांना शोध पत्रकारिता, प्रवीण पाटील यांना आरोग्यदूत, मधुअण्णा खुळे यांना समाजसेवा गौरव, जयवंत जाधव यांना शिक्षण रत्न, शहाजी साळुंखे यांना पर्यटन भूषण, शुभम यादव यांना युवा कृषिरत्न आणि ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टला अध्यात्मा सेवा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते  सन्मानित करण्यात येणार आहे.

        या कार्यक्रमात नेमबाजीतील राष्ट्रीय खेळाडू अमेय निकम, विधीतज्ञ  धनाजी जाधव-पाटील, विधीतज्ञ  प्रविण गोरे,सुनिल शेडगे यांचा ही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

        कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष धनाजी कणसे,उपाध्यक्ष सूर्यकांत पवार व सर्व सदस्य यांनी केले आहे.

  न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 



     

Post a Comment

0 Comments