Type Here to Get Search Results !

उंब्रज पारदर्शक पुल दोन महिन्यात निघणार निविदा - आमदार मनोज दादा घोरपडे

 उंब्रज पारदर्शक पुल दोन महिन्यात निघणार निविदा - आमदार मनोज दादा घोरपडे

 वेणेगाव - उंब्रज ता. कराड येथील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या भरीव पुलाच्या  ऐवजी पारदर्शक उड्डाण पूल बांधण्यासाठी  कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे  आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे आधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

    कराड उत्तर मधील उंब्रज या गावची बाजारपेठ ही फार मोठी असल्याकारणाने तसेच या ठिकाणी कारखान्याची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी पारदर्शक पुल करण्यासाठी उंब्रज परिसरातील नागरिकांनी  महामार्गावरती चक्का जाम आंदोलन केले होते. त्यावेळी विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यावरती आंदोलन केलं म्हणून  गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन उंब्रज येथील पारदर्शक पुलाची मागणी केली होती. यानंतर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नागपूर येथे नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन उंब्रज येथे  पुलाची आवश्यकता का आहे या संदर्भात चर्चा  केली होती. नितीन गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यानी आ. मनोजदादा घोरपडे  यांच्या सोबत कराड उत्तर अंतर्गत येणाऱ्या नागठाणे, अतीत, निसरळे, काशीळ, पेरले, उंब्रज , वराडे  येथील अंडरपास व उंब्रज पारदर्शक पुलाची प्रत्येक्ष पाहणी केली. त्या अनुषंगाने काल हायवेचे अधिकारी आणि आ. मनोजदादा घोरपडे यांच्यामध्ये या विषयी सविस्तर चर्चा झालेली असून लवकरच उंब्रज येथील पारदर्शक पुलाची निवेदा निघणार आहे. तसेच नागठाणे, निसराळे, काशीळ, येथील अंडरपास मोठे करून उंची वाढण्यासाठी काही बदल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिल्या. येत्या दोन महिन्यांमध्ये उंब्रज पारदर्शक पुलाची निविदा काढण्यात येणार असून इतर अंडरपास चे काम दर्जेदार व लवकर करण्यात येईल.

 सदर बैठकीस संजय कदम  प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर, विशाल मिसाळ वरिष्ठ व्यवस्थापक अदानी रोड ट्रान्सपोर्ट, जितेश गोहर वरिष्ठ व्यवस्थापक डीपी जैन आणि कंपनी, राजेश खत्री कन्ट्रक्शन मॅनेजर आदानी रोड ट्रान्सफर लिमिटेड,अजित घारे सहाय्यक  वरिष्ठ व्यवस्थापक डीपी जैन लिमिटेड आदी उपस्तित होते.

                              चौकट
   उंब्रजला पारदर्शक पूल करण्यासाठी महामार्गवरती चक्काजाम आंदोलन झाले होते.त्यावेळेस मनोजदादा घोरपडे यांनी उंब्रज पारदर्शकपूल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचा पारदर्शक पुल होणारच  असा विश्वास आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला





Post a Comment

0 Comments