दहीवडी पोलिसांनी आरोपीला एक तासात केले जेरबंद
पिंगळी बु.- पिंगळी बु.(ता.माण )
येथील विशाल आनंदराव जाधव वय ३४ या युवकाने शुक्रवार दि.१० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जन्म दात्या आई संगीता आनंदराव जाधव यांचा पाण्याचा हंडा डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली.माहिती कळल्यावर घटना स्थळी धाव घेत दहिवडी पोलीस स्टेशनंचे सपोनि अक्षय सोनविणे आणि कर्मचारी यांनी एका तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दारूच्या नशेच्या आहारी गेलेला विशाल आनंदराव जाधव (वय ३४) हा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. त्यावेळी आई (संगीता आनंदराव जाधव. वय ६० वर्ष )या झोपल्या होत्या. तो आईला म्हणाला मला जेवायला वाढ त्यावर आई म्हणाली की तू रोज दारू पिऊन येतोय मी तुला जेवायला वाढणार नाही. हाताने घेऊन खा असे म्हटल्यामुळे त्याला एवढा राग आला की त्याने दारूच्या नशेत जवळच असलेला पाण्याचा हंडा उचलला व चार ते पाच वेळा आईच्या डोक्यामध्ये जोरदार मारला. त्यामुळे आईच्या डोक्यामध्ये जोरदार वार झाले आणि रक्तप्रवाह वाहू लागला. नंतर नातेवाईकांनी संगीता यांना दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी हलविले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितले. सातारा येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्यानंन्तर नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.व दहिवडी शोककळा पसरली
फोटो...
दहिवडी :अटकेत असलेला आरोपी विशाल जाधव(वय३४वर्ष )समवेत सपोनि. अक्षय सोनवणे व पोलीस कर्मचारी
न्यूज24जनसेवक सह अविनाश कुलकर्णी

Post a Comment
0 Comments