Type Here to Get Search Results !

*म्हसवड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी*

 अल्पवयीन मुलींच्या अपहरण अनुषंगाने दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील आरोपी पंढरपूर आणि कराड येथून ताब्यात

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे म्हसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने बेस्ट डिटेक्शन

दहिवडी - म्हसवड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोटेवाडी वरकुटे म्हसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदार यांच्या कायदेशीर राखवलीतून फूस लावून पळवून घेऊन गेले बाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

 या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचे गांभीर्य बघून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपहरित मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शीताफिने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत. सदरील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे,महिला पोलीस हवालदार मैना हांगे,पोलीस नाईक अमर नारनवर,पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे,पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी मदत केली.



Post a Comment

0 Comments