वेणेगाव येथील श्री पद्मावती देवीच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभI
वेणेगाव - वेणेगाव ता सातारा येथील ग्रामदैवत श्री पद्मावती माता मंदिरात यात्रेच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री पद्मावती देवीच्या यात्रे दरम्यान घेणेत येणाऱ्या कार्यकामा बाबत सविस्तर चर्चा कारण्यात आली. श्री पद्मावती देवीची यात्रा 19 ते 22 एप्रिल दरम्यान येत असून दि 19 रोजी मंदिराचा वर्धापन दिन, दि 20 एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस संध्याकाळी देवीचा छबीना, दि. 21 रोजी खेळणे, दि. 22 रोजी संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्याचे बैठकी दरम्यान ठरविण्यात आले. दरम्यान ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेऊन आपले मत मांडले उपस्थित ग्रामस्थांनी मांडलेल्या मतांवर चर्चा केली. या बैठकी साठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान यात्रेचा शुभारंभ गावातील जेष्ठ नागरिक मधुकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला आणि बैठक संपन्न करण्यात आली.

Post a Comment
0 Comments