Type Here to Get Search Results !

वेणेगाव येथील श्री पद्मावती देवीचीआज पासून वार्षिक यात्रा

 वेणेगाव येथील श्री पद्मावती देवीची आज शनिवार पासून वार्षिक यात्रा उत्सव

वेणेगाव - सातारा तालुक्यातील वेणेगाव येथील  जागृत देवस्थान असलेल्या श्री पद्मावती देवीची वार्षिक यात्रा 19 एप्रिल पासून सुरु होत आहे.या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन असून संध्याकाळी क्लासिक भजनाचा कार्यक्रम व महाप्रसाद आहे.या निमित्ताने गावकऱ्यांनी लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून यात्रेच्या मुख्य दिवशी दि.20 रोजी  सकाळ पासून देवीचा अभिषेक पूजा तसेच पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी केले जातील सायंकाळी ढोल, ताशा, सनई तसेच गुलाल व अतिशबाजीच्या गजरात देवीचा छबीना निघणार आहे.दि.21 रोजी खेळणे असून दि.22 रोजी लावणी सम्राज्ञी राधिका पाटील पुणेकर यांचा भारदार लावण्याचा कार्यक्रम होणार आहे.हा यात्रा उत्सव गावाचा असून या मध्ये सर्वांनी मिसळून तो आनंदात साजरा करण्याचे आवाहन गावातील जेष्ठ नागरिकांनी तसेच ग्रामस्थांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments