लाडक्या बहिणीचा एप्रिल चा लवकरच बँक खात्यात - आदिती तटकरे
वेणेगाव - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत एप्रिल महिन्याचा हप्ता येणार असल्याचे सांगितले. आदिती तटकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल
लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्या आहेत. अदिती तटकरे यांनी अक्षय्य तृतीयेला बहिणींच्या खात्यात एप्रिलचे १५०० रूपये जमा होतील, असे सांगितले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता वेळेवर लाडकीच्या खात्यात जमा झाला नाही. यासंदर्भात अदिती तटकरेंनी आता नवी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘येत्या २ ते ३ दिवसांत खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईलआदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत प्रदान करते. महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोट्यवधी महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलाय. एप्रिलचा हप्ता वेळेत जमा होण्याची अपेक्षा असताना काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याची चर्चा होती. मात्र, तटकरे यांच्या या पोस्टमुळे लाभार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे

Post a Comment
0 Comments