Type Here to Get Search Results !

म्हसवड पोलिसांची मनात धडकी भरीवणारी कारवाई

 अवैध धंद्याला चाप दारू, मडका, जुगार अड्डयावर धडाकेबाज कारवाई

सातारा -  अवैध धंद्याचे समूळ नष्टीकरण करण्याच्या उद्देशाने म्हसवड पोलीस ठाणे च्या हद्दीत अवैध धंदा करणाऱ्यांच्या मनात धाकडी भरीवणारी कारवाई करत सपोनि अक्षय सोनवणे सह टीमने धडाकेबाज कारवाईत एका दिवसात 5 गुन्हे दाखल केले.

    पोलिसांनी दिलेल्या अधिक नुसार अवैध धंद्याचे समूळ नष्टीकरण करण्यासाठी पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या धंद्यावर कारवाई करीत देशी दारू व हातभट्टी दारू जप्त करून दारू विक्री करणाऱ्या निलेश बाबू जाधव रा. म्हसवड,दादासो सोपान जाधव रा. वडजल,सुनिता आनंदा बनसोडे रा.रांजणी असे तीन गुन्हे दाखल केले तर अवैध मटका जुगार घेणाऱ्या दत्ता अंबादास जाधव रा. म्हसवड, हेमंत दादा जाधव रा म्हसवड यांचे  वर दोन गुन्हे दाखल करून अवैध धंदा मोडीत काढला.

      सदरील कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे,सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे,अमर नारणवर,सुभाष भोसले, मैना हांगे,सुरेश हांगे,जगन्नाथ लुबाल, अनिल वाघमोडे, धिरज कवडे,नवनाथ शिरकोळे यांनी केली.



Post a Comment

0 Comments