सातारा - मागील काही दिवसापासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांसह, दिव्यांग, रुग्ण, विधवा तसेच समाजातील विविध घटकांच्या न्याय हक्का साठी अन्नत्याग आंदोलन करत असून या अनुषंगाने मानवी हक्क संरक्षण समितीने निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, सध्या आपण अमरावतीतील मोझरी येथे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेत मजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ, दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून वेळेवर देण्यासंदर्भात मागणीसाठी आपली जीवाची बाजी लावून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे यास भारत देशातील सर्व गरजु नागरिकांच्या मानव अधिकारांसाठी लढणाऱ्या मानव अधिकार संरक्षण समिती (Human Right Protection Society) या संघटने आणि संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यां तर्फे समर्थन पत्राद्वारे जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. आणि शासनाला आमच्या संघटने कडून आव्हान केले जात आहे की, आपल्या अन्नत्याग आंदोलनाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या.
कारण आपण समाजातील ज्या वर्गातील लोकांसाठी आंदोलन करीत आहात ते आधी मानव आहेत. आणि त्यांना त्यांचा मानव हक्क मिळालाच पाहिजे. तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे.
तरी आमच्या मानव अधिकार संरक्षण समिती या संघटनेतर्फे आपल्या आंदोलनास देण्यात येणाऱ्या समर्थनाचा स्वीकार करावा. ही नम्र विनंती धन्यवाद
संपादक - प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments