वेणेगाव - देशमुखनगर (ता सातारा) गावाचा सुपुत्र मास्टर सर्वेश सतीश देशमुख याने आपल्या क्रीडा कौशल्याचा उत्तम प्रत्यय देत लांबउडी स्पर्धेत मोठ्या गटात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाच्या जोरावर सर्वेशची निवड सिद्धनाथ मेगा सिटी क्रीडा संकुल, म्हसवड (ता. माण, जि. सातारा) येथे होणाऱ्या निवासी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी झाली आहे.
या यशाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच तसेच देशमुखनगर ग्रामस्थ यांनी मास्टर सर्वेशचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
देशमुखनगरच्या या युवा खेळाडूने दाखवलेली कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून गावाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी ही आनंददायी सुरुवात मानली जात आहे.

Post a Comment
0 Comments