Type Here to Get Search Results !

सुरेखाताई पखाले दहिवडी उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड


सुरेखाताई पखाले दहिवडी उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड – जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा:

अविनाश कुलकर्णी पिंगळी

दहिवडी (ता. माण, जि. सातारा) – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. मा. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले यांची बुधवार, दि. ३० जुलै २०२५ रोजी दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे दहिवडी नगरपंचायतीच्या नेतृत्वाला नवे बळ मिळाले असून, महिला सक्षमीकरणाचाही एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

या यशस्वी निवडीनंतर आज दहिवडी येथे नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी स्वतः उपस्थित राहून भगिनी सुरेखाताई पखाले यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी आयोजित कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य, श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), पतसंस्थेचे संचालक संजयकाका गांधी, नगरपंचायत सदस्य, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरेखाताई पखाले यांनी आपल्या मनोगतातून दहिवडीच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. तसेच नगरपंचायतीच्या विविध विकास कामांना गती देण्याचा आणि लोकसहभागातून स्वच्छ, सक्षम व आधुनिक दहिवडी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.

ही निवड बिनविरोध झाल्याने त्यांच्या नेतृत्वाची एकमताने झालेली निवड म्हणून विशेष उल्लेखनीय ठरते.



Post a Comment

0 Comments