Type Here to Get Search Results !

वेणेगाव येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न


वेणेगाव येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या आमदार निधीतून कामाला प्रारंभ

वेणेगाव - वेणेगाव (ता. सातारा) कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2025 अंतर्गत वेणेगाव येथील क्रांती उदय गणेशोत्सव मंडळा समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
         या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ. समता ताई मनोज घोरपडे व कार्याध्यक्ष सौ. तेजस्विनी ताई संग्राम घोरपडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
              कार्यक्रमाची सुरुवात प्रस्ताविक खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. सुनील काटे देशमुख यांनी केली. त्यांनी रस्त्याचे महत्त्व अधोरेखित करत गावाच्या विकासासाठी ही पायाभूत सुविधा कशी उपयोगी ठरेल यावर प्रकाश टाकला.
        यानंतर समता ताई घोरपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “स्त्री शक्तीला समाजात विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी करून घेतल्यास प्रगती अटळ आहे. या रस्त्यामुळे ग्रामस्थांना अधिक चांगला दळणवळण मार्ग मिळणार आहे.”
          तेजस्विनी ताई  घोरपडे यांनी आपल्या भाषणात कराड उत्तरमधील सर्वसामान्य जनतेसाठी आमदार मनोजदादा घोरपडे सातत्याने प्रयत्नशील आहेत, असे सांगून गावातील युवकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
       माजी सरपंच सौ. धनश्री सावंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार घोरपडे यांचे आभार मानले व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भगवान सावंत यांनी केले.
  या प्रसंगी मंचावर उपस्थित होते –
खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. सुनील काटे देशमुख,युवा नेते व उद्योजक श्री. मोहित काटे देशमुख,तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेंद्र घोरपडे,जिल्हा पंचायतराज उपाध्यक्ष श्री. विठ्ठल काकडे,वेणेगावच्या सरपंच सौ. वंदना काटे देशमुख,उपसरपंच सौ. वैशाली चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य सौ. सविता घोरपडे व श्री. अकबर मुलाणी
             या कार्यक्रमाला क्रांती उदय गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याच बरोबर स्वाभिमानी महिला सखी मंचच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, गावातील महिला भगिनी, युवक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
  



.

Post a Comment

0 Comments