नागठाणे महाविद्यालयाचा प्रेरणादायी उपक्रम : सुधारित अभ्यासक्रमावरील राज्यस्तरीय कार्यशाळा
नागठाणे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील छोटेसे महाविद्यालय असूनही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार बी.ए. भाग दोनच्या हिंदी, इतिहास व समाजशास्त्र विषयांच्या सुधारित अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन श्री. शशिकांत यशवंत काटे (प्राचार्य, रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, नागठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड राहणार आहेत.
हिंदी, इतिहास व समाजशास्त्र या विषयांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन, ज्येष्ठ प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयांतील विषय तज्ज्ञ बीजभाषण व मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत बी.ए. भाग दोनचे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या प्राध्यापकांना थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम शैक्षणिक दिशा पोहोचणार आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयाने अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करून शैक्षणिक क्षेत्रात भरीव पाऊल टाकले आहे, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, हिंदी विभाग प्रमुख प्रा. शौकत आतार, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अजितकुमार जाधव व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अभय जायभाये यांनी सर्व प्राध्यापकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments