सासपडे खून प्रकरणातील संशयित आरोपी राहुल यादव यास सातारा न्यायालयात पोलिस कोठडी!
नागठाणे (प्रमोद पंचपोर)– सासपडे (ता. सातारा) येथे झालेल्या धक्कादायक अल्पवयीन बालिकेच्या खून प्रकरणात संशयित आरोपी राहुल बबन यादव (वय ३४) यास सातारा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे (गु.र.नं. 263/2025), भा.न्या. सं 2023 कलम 103(1) तसेच POCSO कलम 8, 12 अंतर्गत वाढ करून आरोपीविरुद्ध गंभीर पुरावे पोलिसांना सापडले आहेत.
तपासादरम्यान आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शेटे यांनी सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षीरसागर यांच्या विनंतीवरून आरोपीस दिनांक 18/10/2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सदर प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक मा. तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक मा. राजीव नवले आणि सातारा शहर विभाग सातारा चे मार्गदर्शना खाली बोरगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. धोंडीराम वाळवेकर यांच्या देखरेखीखाली वेगाने सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीस पुढील चौकशीसाठी कोठडीत ठेवले असून, प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. समाजात या धक्कादायक घटनेने तीव्र प्रतिक्रिया निर्माण केली आहे, आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे खऱ्या न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे

Post a Comment
0 Comments