सातारा विधानसभा शिवसेना सोशल मीडिया प्रमुखपदी पंकज जाधव यांची निवड!
वेणेगाव (प्रमोद पंचपोर ) : सातारा सर्किट हाऊस येथे शिवसेना सातारा जिल्हा सोशल मीडिया आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. महादेव सलवदे, श्री. सौरभ कुलकर्णी, जिल्हाप्रमुख तसेच सर्व विधानसभा प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील सोशल मीडियाच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. पक्षाच्या विचारधारेचा प्रसार अधिक जोमाने घराघरात पोहोचवण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, चंद्रकांत जाधव, अविनाश फडतरे, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, सोशल मीडिया प्रमुख निवास महाडिक, तुकाराम तुपे, तसेच विविध विधानसभा मतदारसंघांचे पदाधिकारी उपस्थित होते
या बैठकीत सातारा विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी पंकज जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच वाई विधानसभा सोशल मीडियासाठी सौरभ राक्षे, धीरज लोहार, निखिल शिंदे, अक्षय भोसले यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली
यावेळी सातारा शहर प्रमुख हर्षद माने, महाबळेश्वर शहर प्रमुख नयन सपकाळ आणि पाचगणी शहर प्रमुख विकास वाघमारे यांना नियुक्तीपत्र देऊन नेमणूक करण्यात आली
या प्रसंगी शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. महादेव सलवदे आणि श्री. सौरभ कुलकर्णी यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आगामी काळातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments