Type Here to Get Search Results !

कराड उत्तर मतदारसंघातील २४ गावांसाठी २.५० कोटींचा निधी मंजूर

 कराड उत्तर मतदारसंघासाठी २.५० कोटींचा विकासनिधी – आमदार मनोजदादा घोरपडे यांचा पुढाकार

वेणेगाव (प्रमोद पंचपोर) : कराड उत्तर मतदारसंघातील ग्रामीण भागात धार्मिक, सामाजिक तसेच मूलभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी राज्य शासनाच्या २५/१५ योजनेतून तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून मंदिर सभामंडप, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, स्मशानभूमी रस्ते, गटर बांधणी आदी विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे व सार्वजनिक सोयी अधिक सक्षम होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

खटाव तालुक्यातील पारगाव महादेव मंदिर सभामंडप, चोराडे नंदीवाले समाज सभामंडप, मुसांडवाडी-जगतापवाडी हनुमान मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक व वॉल कंपाउंड, वांझोळी ज्योतिर्लिंग मंदिर सभामंडप, तसेच म्हासुर्णे येथील जानुबाई मंदिर सभामंडपासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी म्हातोबा मंदिर परिसर सुशोभिकरण, जायगाव येथील उर्वरित सभामंडपाचे काम, मुळीकवाडी अंतर्गत काँक्रीटीकरण या प्रत्येक कामांसाठी १० लाख रुपये तर मोहितेवाडी येथील मुख्य चौकातील खुले आर.सी.सी. स्टेज व वर स्लॅब बांधणीसाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सातारा तालुक्यातील माजगाव मारुती मंदिर सभागृह, भैरवगड अंतर्गत काँक्रीटीकरण, आंबेवाडी स्मशानभूमी रस्ता, निनाम गावातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, काशीळ येथील राम मंदिर सभामंडप, कामेरी टेकावरील गटर व रस्ता काँक्रीटीकरण, तसेच खोजेवाडी स्मशानभूमी दुरुस्ती या सर्व कामांना दहा लाख रुपयांपर्यंत निधी मिळाला आहे.

कराड तालुक्यातील मेरवेवाडी सिद्धनाथ मंदिर सभामंडप, रिसवड ताय येथील तुळजाभवानी मंदिर रस्ता व मंडप, वाघेश्वर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, घोलपवाडी महादेव मंदिर सभामंडप, किवळ ज्ञानेश्वर मंदिर सभामंडप, सावरघर मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक व रस्ता काँक्रीटीकरण, उंब्रज रुक्मिणीनगर सभामंडप, तसेच शिवडे हिराई गार्डन रस्ता व गटर बांधणी यासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

एकूण २४ गावांतील विकासकामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागात विकासाचा वेग वाढणार असून, लोकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना दिलासा मिळाला आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाबद्दल आमदार मनोजदादा घोरपडे यांचे मनापासून आभार मानले असून, “दादांच्या प्रयत्नांमुळे खऱ्या अर्थाने गावागावात विकास पोहोचत आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.




Post a Comment

0 Comments