Type Here to Get Search Results !

अंगापूर तर्फ मध्ये महिला आर्थिक व डिजिटल सक्षमीकरणाचा उपक्रम यशस्वी

 अंगापूर तर्फ महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण संपन्न


अंगापूर (प्रमोद पंचपोर) :

गावातील गणेश मंदिर येथे स्वाभिमानी सखी मंच कराड उत्तर यांच्या सहकार्याने तसेच लाडली फाउंडेशन आणि N.P.S.T. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात गावातील महिलांना डिजिलॉकर, टाइम पे, रेशन कार्ड नोंदणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षक म्हणून प्रमोद पंचपोर यांनी महिलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले, तर स्वाभिमानी सखी मंचचे संपर्क प्रमुख दादासाहेब घोरपडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास अंगापूर तर्फच्या सरपंच सौ. विशाखा शेडगे, तसेच सी.आर.पी. सविता काळे उपस्थित होत्या. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आणि कार्यक्रमानंतर त्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे, स्वाभिमानी सखी मंचच्या अध्यक्षा समता ताई घोरपडे व कार्याध्यक्षा तेजस्विनी ताई घोरपडे यांच्या प्रोत्साहनपर कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

महिलांनी व्यक्त केले की, “स्वाभिमानी सखी मंचच्या माध्यमातून आम्हाला शासनाच्या विविध महिला कल्याण योजनांची माहिती मिळते. महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण तसेच ‘महालक्ष्मी महिला सक्षमीकरण योजना’ व ‘मिशन शक्ति’सारख्या योजना प्रत्यक्ष लाभदायी ठरत आहेत.”

या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी पुढेही अशा प्रशिक्षणांच्या माध्यमातून आर्थिक व डिजिटल साक्षरतेचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments