अपशिंगे (मि.) येथे स्वाभिमानी महिला सखी मंचतर्फे अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी
प्रमोद पंचपोर
वेणेगाव :- अपशिंगे (मि.) येथे स्वाभिमानी महिला सखी मंचच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजकारणी, कवी व दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती अत्यंत सन्मानपूर्वक व उत्साहात साजरी करण्यात आली.
शशी कॉम्प्युटरच्या संचालिका सारिका निकम यांनी उपस्थितांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांनी वाजपेयी यांच्या साधेपणा, राष्ट्रभक्ती, लोकशाही मूल्यांवरील निष्ठा, तसेच भारताच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. श्री. मनोजदादा घोरपडे, स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा समताताई घोरपडे तसेच कार्याध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा वैचारिक कार्यक्रमांचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी सारिका निकम, कोमल निकम, रूपाली निकम, रोहिणी निकम, भारती पवार, जयश्री निकम, नम्रता मोरे, अनुराधा पवार, मंगल निकम, स्नेहल थोरात, स्नेहल मांडवे, पायल चव्हाण, साक्षी गडकरी, सानिका निकम, राधा ढाणे, प्रतीक्षा भोसले, सिद्धी निकम, कविता मोरे, काजल शितोळे, स्नेहल निकम, कोमल यादव, क्षमा सुर्वे, तबसुम मुलाणी, नाजमीन सय्यद, सानिका गवळी यांच्यासह स्वाभिमानी महिला सखी मंचच्या सर्व सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व महिलांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प केला.

Post a Comment
0 Comments