कराड उत्तरचे नेतृत्व पुन्हा सिद्ध : रहिमतपूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी रहिमतपूर नगरपालिका अखेर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि त्यासोबतच कराड उत्तरच्या राजकीय समीकरणांवर ठाम शिक्कामोर्तब झाले. या विजयामागे केवळ संख्याबळ नव्हे, तर नेतृत्व, दूरदृष्टी आणि अचूक राजकीय रणनीती यांचा परिपक्व संगम दिसून आला.
रहिमतपूर नगरपालिका भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मा. सौ. वैशाली निलेश माने या विजयी झाल्या असून, या निवडणुकीत भाजपचे ९ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ९ नगरसेवक आणि शिवसेना (शिंदे गट) २ नगरसेवक निवडून आले आहेत. या निकालानंतर संपूर्ण परिसरात मा. आमदार मनोजदादा घोरपडे यांचा विजयी जल्लोष पाहायला मिळाला.
या संपूर्ण घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले ते कराड उत्तरचे दमदार, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्व — मा. आमदार मनोजदादा घोरपडे. सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि स्पष्ट भूमिका यांच्या जोरावर त्यांनी कराड उत्तरमध्ये भाजपची पकड अधिक भक्कम केली आहे. रहिमतपूर नगरपालिकेतील सत्ता परिवर्तन हे त्यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचे ठोस प्रतीक मानले जात आहे.
या विजयामध्ये कराड उत्तरच्या राजकारणातील चाणक्य युवा नेते मा. संग्रामबापू घोरपडे यांचे धुरंदर राजकीय कौशल्य निर्णायक ठरले. बदलत्या राजकीय परिस्थितीचे अचूक आकलन, योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ यामुळे ही लढत भाजपच्या बाजूने वळली.
त्याचबरोबर मा. विक्रमनाना घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संघटन पातळीवर मजबूत बांधणी झाली. त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला पराभव स्वीकारावा लागला आणि रहिमतपूरमध्ये भाजपने निर्णायक विजय मिळवला.
नगराध्यक्ष पदी मा. सौ. वैशाली निलेश माने यांची निवड ही केवळ पदाची निवड नसून, स्थैर्य, विश्वास आणि विकासाभिमुख प्रशासनाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रहिमतपूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
एकूणच, रहिमतपूर नगरपालिकेवरील भाजपचा विजय म्हणजे कराड उत्तरच्या राजकारणातील नेतृत्वाचा स्पष्ट आणि ठाम संदेश आहे.
“कराड उत्तरचे एकच उत्तर — मा. आमदार मनोजदादा घोरपडे” हे विधान पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध झाले आहे.

Post a Comment
0 Comments