Type Here to Get Search Results !

बारामतीजवळ विमान अपघात; उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

बारामतीजवळ विमान अपघात; उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

बारामती | प्रतिनिधी

मुंबईहून बारामतीकडे निघालेले खासगी विमान आज सकाळी लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले. या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर विमानाने सकाळी ८.१० वाजता मुंबईहून टेकऑफ केला होता. नियोजित वेळेनुसार विमानाचे सकाळी ८.५० वाजता बारामतीत लँडिंग होणार होते. मात्र लँडिंगच्या वेळी तांत्रिक अडचण किंवा अन्य कारणामुळे विमानाचा तोल गेला आणि अपघात झाला.
 विमानात कोण होते?
विमानात एकूण ५ प्रवासी / कर्मचारी होते:
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
मुंबई पीएसओ – हवालदार विदीप जाधव
कॅप्टन सुमित कपूर – पायलट
कॅप्टन संभवी पाठक – सह-पायलट
पिंकी माळी – फ्लाइट अटेंडंट
अपघातानंतर घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय पथके दाखल झाली. मात्र दुर्घटना अत्यंत भीषण असल्याने कोणालाही वाचवता आले नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.
 तपास सुरू
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरी विमान वाहतूक विभाग (DGCA) व संबंधित यंत्रणांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.


Post a Comment

0 Comments