Type Here to Get Search Results !

वर्णे गटात वैभव चव्हाण यांचा प्रचाराचा धुरळा, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

 वर्णे गटात वैभव चव्हाण यांचा प्रचाराचा धुरळा, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

वेणेगाव - वर्णे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार वैभव चव्हाण यांचा प्रचार सध्या अक्षरशः धुरळा उडवत सुरू आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हा प्रचार जोमात सुरू असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळपासून रात्रीपर्यंत पदयात्रा, घरभेटी, कोपरा सभा आणि कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून वैभव चव्हाण थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. शेतकरी प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण आणि युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली विकासाभिमुख भूमिका नागरिकांना भावत आहे.

प्रचारादरम्यान मनोज दादा घोरपडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत एकसंघपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.

तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस समर्थकांची संख्या वाढताना दिसत आहे. एकंदरीतच, वर्णे गटात वैभव चव्हाण यांचा प्रचार वेगाने पुढे जात असून निवडणुकीत त्यांनी मजबूत आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.



Post a Comment

0 Comments