श्री पद्मावती माता मंदिरात प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न होणार
प्रतिनिधी - वेणेगाव येथील श्री पद्मावती माता मंदिरात प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
बुधवार दिनांक २५/०२/२०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री पद्मावती मातांच्या मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवार दिनांक २६/०२/२०२६ रोजी सकाळी ०७ ते १२ या वेळेत मूर्तीची विधीवत पूजन, प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी कार्तिक स्वामी मठाधिपती परमपूज्य वाघ महाराज यांच्या शुभहस्ते कार्यक्रम होणार असून, त्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत.
तरी सर्व भाविक, भक्त, ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ वेणेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments