Type Here to Get Search Results !

वर्णे येथे ३ फेब्रुवारीला भव्य ‘परिवर्तन संकल्प सभा

 वर्णे येथे ३ फेब्रुवारीला भव्य ‘परिवर्तन संकल्प सभा’

प्रतिनिधी | वर्णे (ता. सातारा)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच वर्णे जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार श्री. राजू शेळके यांच्या प्रचारानिमित्त वर्णे (ता. सातारा) येथे भव्य परिवर्तन संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दि. ०३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता वर्णे येथील जिल्हा परिषद शाळेजवळील मैदानावर होणार असून, परिसरातील नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये या सभेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या परिवर्तन संकल्प सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, माजी मंत्री श्री. बाळासाहेब पाटील, खासदार श्री. निलेश लंके, राज्यसभा खासदार श्री. नितीन काका पाटील तसेच युवा नेतृत्व श्री. साहिल बाबा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील परिवर्तन तसेच जनतेच्या मूलभूत समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून, आगामी काळातील विकासाचा ठोस आराखडा मांडण्यात येणार आहे. वर्णे जिल्हा परिषद गटात परिवर्तन घडविण्याचा संकल्प या सभेतून व्यक्त केला जाणार आहे.

या परिवर्तन संकल्प सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments