नागठाणे गावाचे आधारवड हरपले; जेष्ठ समाजसेवक मधुकर आण्णा खुळे-देशमुख यांचे दुःखद निधन
नागठाणे - नागठाणे गावचे जेष्ठ समाजसेवक, सर्वांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे आदरणीय श्री. मधुकर आण्णा खुळे-देशमुख यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने नागठाणे नगरीवर शोककळा पसरली असून, संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
आण्णांनी आयुष्यभर समाजसेवेचा ध्यास घेत, अनेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली. त्यांचा साधेपणा, मनमिळावूपणा आणि लोकांप्रती असलेली आपुलकी यामुळे ते सर्वांच्या हृदयात घर करून राहिले होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेले योगदान आणि समाजासाठी झटणारी त्यांची वृत्ती कायम स्मरणात राहील.
त्यांच्या जाण्याने गावाने एक आधारवड गमावला आहे. त्यांच्या आठवणींनी प्रत्येकाचे मन व्यथित झाले असून, त्यांच्या कार्याचा ठसा कायम प्रेरणादायी राहणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. खुळे-देशमुख कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण नागठाणे गाव सहभागी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment
0 Comments