Type Here to Get Search Results !

देशमुखनगर शाळेची विद्यार्थिनी आराध्या शिंदेचा दुहेरी यशाने तालुक्यात ठसा

 देशमुखनगर शाळेची विद्यार्थिनी आराध्या शिंदेचा दुहेरी यशाने तालुक्यात ठसा

वेणेगाव - पंचायत समिती सातारा शिक्षण विभागातर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देशमुखनगर येथील कु. आराध्या सुनील शिंदे हिने उल्लेखनीय कामगिरी करत इयत्ता सहावी ते आठवी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

याचबरोबर स्वर्गीय छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतही तिने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.

आराध्याला वर्गशिक्षिका सौ. नीता पाटील, मुख्याध्यापिका सौ. हेमांगी भस्मे, श्री. नानासाहेब जाधव, सौ. उज्वला कुंभार तसेच वडील श्री. सुनील शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती सातारा येथे मा. सभापती श्री. महेश गाडे, मा. उपसभापती सौ. सुषमा जाधव तसेच पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे व गटशिक्षणाधिकारी श्री. नितीन जगताप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कामगिरीबद्दल गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

देशमुखनगर शाळा शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धा व विविध उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले 



Post a Comment

0 Comments