Type Here to Get Search Results !

पुनर्वसित गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे नेतृत्व; भांबे येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांची कोटींची विकासकामे

पुनर्वसित गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे नेतृत्व; भांबे येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांची कोटींची विकासकामे

 वेणेगाव - कराड उत्तर मतदारसंघातील पुनर्वसित गावांच्या प्रश्नांना न्याय देत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा दृढ संकल्प केलेले आमदार मनोजदादा घोरपडे यांनी भांबे (ता. कराड) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करून ग्रामस्थांना तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकासकामांची ऐतिहासिक भेट दिली.

गेली अनेक दशके पुनर्वसित गावांच्या वाट्याला केवळ आश्वासनेच आली. मूलभूत सुविधा, रस्ते, पिण्याचे पाणी, सभामंडप, सार्वजनिक सोयी-सुविधा यांसाठी ग्रामस्थांना सतत संघर्ष करावा लागला. मात्र आमदार मनोजदादा घोरपडे यांनी या गावांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करून दाखवली आहे. त्यामुळे पुनर्वसित गावांच्या विकासाला आता नवी दिशा आणि नवा वेग मिळत आहे.

भांबे हे लहानसे पुनर्वसित गाव असले तरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आमदार घोरपडे यांनी विकासात गावाच्या आकारापेक्षा लोकांच्या गरजांना प्राधान्य दिले. ग्रामस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात करून दिली.

कार्यक्रमात बोलताना आमदार घोरपडे म्हणाले की, कराड उत्तर मतदारसंघात एकूण ३५ पुनर्वसित गावे असून ही गावे गेली ३५ ते ४० वर्षे विविध मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहेत. या गावांना न्याय मिळवून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून प्रत्येक पुनर्वसित गावाचा टप्प्याटप्प्याने सर्वांगीण विकास केला जाईल. पुनर्वसित गावांतील नागरिकांना कोणत्याही सुविधेसाठी वंचित राहू देणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, पालगट परिसराचे नेते सुरेशतात्या पाटील, पंचायत समिती सदस्य धैरजा माने, रणजित पाटील, प्रकाश काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरेशतात्या पाटील, संदीप काटे, हनुमंत काटे यांनीही मनोगत व्यक्त करून आमदार घोरपडे यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाला दिगंबर बिसे, अनिल माने, अशोक पाटील, हणमंत काटे सर, सरस्वती गुरव (सरपंच), दादासो काटे, सुभाष काटे, अंकुश काटे, सचिन काटे, जयसिंग काटे, अक्षय यादव, आबाजी काटे, चंद्रकांत काटे, दत्तात्रय काटे, विलास काटे, गणेश काटे, महेश काटे, सुनील काळभोर, सतीश शिंदे, संतोष यादव, नवनाथ मोरे, लक्ष्मण मोरे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांबे ग्रामस्थांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांचे विशेष आभार व्यक्त करत, “आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करून दाखवणारे नेतृत्व म्हणजे मनोजदादा घोरपडे,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पुनर्वसित गावांच्या विकासासाठी सातत्याने निधी आणून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.



Post a Comment

0 Comments