Type Here to Get Search Results !

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; उंब्रज अप्पर तहसीलच्या स्थापनेला मिळाली गती

 आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; उंब्रज अप्पर तहसीलच्या स्थापनेला मिळाली गती

वेणेगाव दि. 24 : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या उंब्रज येथील अप्पर तहसील स्थापनेच्या प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने महसूल विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उंब्रज अप्पर तहसीलसाठी सूचना व हरकती प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले असून, पुढील १५ दिवसांत नागरिकांकडून सूचना व हरकती मागवून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी कराडचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उंब्रज येथे अप्पर तहसील सुरू झाल्यानंतर कराड तालुक्यातील हजारो नागरिकांना महसुली कामांसाठी कराडला वारंवार जावे लागणार नाही. सातबारा उतारे, विविध दाखले, जमीन नोंदी आदी महत्त्वाची कामे स्थानिक स्तरावरच जलद व सुलभपणे पूर्ण होणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची मोठी बचत होणार आहे.

याबाबत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "कराड उत्तर मतदारसंघातील जनतेची ही अत्यंत महत्त्वाची मागणी होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अप्पर तहसीलची उभारणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

उंब्रज अप्पर तहसीलच्या प्रक्रियेला गती मिळाल्याने कराड उत्तर मतदारसंघातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मनोजदादा घोरपडे यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 



Post a Comment

0 Comments