'दोन थेंब जीवनाचे' अभियानाला वेणेगावात प्रतिसाद
प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरणास सुरुवात
वेणेगाव, दि. 28 जून (प्रतिनिधी) – राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत आज रविवार, दि. 28 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वेणेगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण बूथचा शुभारंभ नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. प्रमोद पंचपोर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित पालकांना संबोधित करताना प्रमोद पंचपोर यांनी, "पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत. ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये," असे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश सुवर्णकार, आरोग्य कर्मचारी सुनिता जाधव, आरोग्य सहाय्यक शुभम सावंत, सेजल भिलारे, वेदांती कांबळे, उज्वला राऊत व मीनाक्षी दीक्षित, नीलम लोहार तसेच लाभार्थी बालके व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. उपस्थित पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देत राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment
0 Comments