समाजसेवेचा जागतिक गौरव; डॉ. अनिल सुभेदार यांना अमेरिकेच्या विद्यापीठाकडून मानद पीएच.डी.
दहिवडी | प्रतिनिधी
दहिवडी (जि. सातारा) येथील समाजसेवक डॉ. अनिल जगन्नाथ सुभेदार यांना America International University, Hollywood (USA) यांच्या वतीने "Honorary Ph.D. (Doctorate in Social Work and Education)" या मानद पदवीसाठी निमंत्रण व अधिकृत पुष्टीपत्र देण्यात आले आहे.
विद्यापीठाने दिलेल्या निमंत्रणानुसार, दि. 31 जुलै 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित विशेष समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
समाजात प्रेम, शांतता, मानवता, सौहार्द, न्याय आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने डॉ. सुभेदार यांची या मानद पदवीसाठी निवड केली आहे. त्यांच्या समाजसेवेचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव मानला जात असून, सातारा जिल्ह्यासाठीही ही अभिमानाची बाब आहे.
डॉ. अनिल सुभेदार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील समाजसेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment
0 Comments