Type Here to Get Search Results !

राज्य नाट्य महोत्सवात नागठाणे महाविद्यालयाच्या 'सोयरीक'चा दिमाखदार विजय

 राज्य नाट्य महोत्सवात नागठाणे महाविद्यालयाच्या 'सोयरीक'चा दिमाखदार विजय

नागठाणे, प्रतिनिधी :

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२५-२६ मध्ये आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणेच्या 'सोयरीक' या एकांकिकेने उत्कृष्ट एकांकिकेचा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत ₹१० हजारांचे रोख पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळवली.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये नितीन पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखन (द्वितीय), ऋतुजा पवार यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना (द्वितीय) पुरस्कार व प्रत्येकी ₹१० हजारांचे पारितोषिक मिळाले. संयोगिता चौधरी हिला उत्कृष्ट अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

या यशामागे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, दिग्दर्शक नितीन पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संतोष निलाखे व सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले.

या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालय प्रशासन आणि गुरुदेव कार्यकर्त्यांनी कलाकार व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राज्यस्तरावर मिळालेली ही उल्लेखनीय दाद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



Post a Comment

0 Comments