Type Here to Get Search Results !

वेणेगाव येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला मिळणार आ. मनोज दादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून मिळणार नवी झळाळी

 वेणेगाव येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला मिळणार आ. मनोज दादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून मिळणार नवी जळाळी.

 वेणेगाव :  वेणेगाव ता. सातारा येथील कृष्णा नदीवरील वेणेगाव कोपर्डे सायळी तुकाईवाडी गावाला जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून मिळणार आहे नवी जळाळी 

                  मागील बरेच दिवसापासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबतची मागणी नागरिकांकडून होत होती. नदीवरील बंधारा हा बऱ्याच गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावरील देखभाल दुरुस्ती आणि पुलावरील रस्त्याचे काम कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून आमदार मनोज दादा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामाचे उद्घाटन मा. विक्रम नाना घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुनील काटे, वैभव सावंत, माजी सैनिक शिवाजी कळसकर, महेश ताटे, विकास घोरपडे, अनिल तोडकर, कृष्णत काटे, चंद्रकांत जाधव, सुनील घोरपडे, निळकंठ घोरपडे, सुधीर शेळके, प्रशांत कणसे, संजय कदम, शहाजी कदम, सचिन कदम, आनंद कदम, तानाजी कदम, संभाजी कदम, चंद्रकांत निकम, सुहास काजळे, सागर कदम, जमीर शेख, फारुक शेख, मोहित काटे, संदेश मोरे, सागर साळुंखे, पत्रकार सतीश जाधव हे उपस्थित होते.

    न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर



Post a Comment

0 Comments