Type Here to Get Search Results !

कामेरी येथील जवान शुभम घाडगे झाले शहीद

 वेणेगाव  - जम्मू काश्मीरच्या भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात कर्तव्य बजावत असताना मंगळवारी दि. 24 रोजी भारतीय लष्कराचे वाहन साधारण 300- 350 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात कामेरी ता सातारा येथील जवान शुभम समाधान घाडगे वय 28 वर्ष यांना वीरमरण आले आहे.संध्याकाळीची ही घटना घडली असून त्यांच्या निधनाचे वृत्त येताच कामेरी सह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

             मिळालेल्या माहिती नुसार या वाहनात 8 ते 10 जवान होते त्या पैकी शुभम घाडगे यांच्या सह 5 जवान शहीद झाले असून उर्वरीत जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोर पोस्टकडे जाणारे  11 एमएलआयच्या लष्करी वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला माहिती मिळताच 11 एमएलआयची क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरु केले
        शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय येथे तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी काँलेज अपशिंगे मि. येथे होऊन पुढे तो लष्करात भरती झाला. शुभम हे कुस्तीचा छंद जोपासत वस्तात धोंडीराम घाडगे हे त्यांचे आजोबा होत.

त्यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. शांत व संयमी सुपुत्राला आलेल्या वीरमरणामुळे कामेरी गाव सुन्न झाला असून शुभमच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर



Post a Comment

0 Comments