Type Here to Get Search Results !

सातारा जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संचालकांचा चर्चासत्र मेळावा संपन्न

सातारा जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र  संचालकांचा चर्चासत्र मेळावा संपन्न. 



वेणेगाव -  राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सर्व सुविधा सहज उपलब्ध होऊन तालुक्याच्या ठिकाणी जावे लागू नये यासाठी महा-ई-सेवा केंद्र  तसेच आधार केंद्र नागरिकांसाठी ठिकठिकाणी  उपलब्ध करून दिली. परंतु ही महा सेवा केंद्र व आधार केंद्र चालवत असलेल्या संचालकांचा विचार न करता त्यांच्या मागण्यांकडे  लक्ष न देता वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित ठेवत केंद्र संचालकांवर अन्यायच होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संचालकांचा चर्चासत्र मेळावा कास रस्त्यावरील  पार्टी हिल रिसॉर्ट येथे संपन्न झाला.

      या मेळाव्या दरम्यान उपस्थित असलेल्या संचालकांना राज्य उपअध्यक्ष शैलेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तसेच तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आली. या मध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष समाधान माने,सातारा जिल्हा उपअध्यक्ष माधुरी पवार,गुलाब गोळे सचिव,प्रशांत फल्ले खजिनदार तर संग्रामसिंह पलंगे (कराड) जिल्हा प्रतिनिधी,अमर ढोले (माण) जिल्हा प्रतिनिधी,मंगेश कांबळे (पाटण) जिल्हा प्रतिनिधी,संतोष सणस (वाई) जिल्हा प्रतिनिधी,मंगेश डोईफोडे (खंडाळा) जिल्हा प्रतिनिधी, याच प्रमाणे अभिजित भागवत खटाव तालुका अध्यक्ष,राहुल बावकर जावली तालुका अध्यक्ष,अरुण घबाडे कराड तालुका अध्यक्ष,सतीश साळुंखे सातारा तालुका अध्यक्ष,अमोल पाटील पाटण तालुका अध्यक्ष,अमोल गुजर माण तालुका अध्यक्ष, महादेव पाटील कोरेगाव तालुका अध्यक्ष,विशाल गाढवे वाई तालुका अध्यक्ष

            या वेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष शैलेंद्र भोईटे म्हणाले जिल्ह्यातील महा ई सेवा तसेच आधार केंद्र यांच्या पाठीशी अखिल भारतीय महा ई सर्व आणि आधार केंद्र संघटना उभी राहणार आहे. जिल्ह्यातील केंद्र चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील  आधार केंद्र खाजकी कंपनीकडे देण्याचा घाट घातला आहे त्याला संपूर्ण राज्यातून विरोध होत आहे. खाजकी करण न होता mahait कंपनीकडे राहावेत या बाबत सकारात्मकता  दिसत आहे. त्याच बरोबर महा ई सेवा केंद्राचे कमिशन ही वाढविण्यासाठी संघटना प्रयत्न करीत आहे.या साठी जिल्ह्यातील सर्व केंद्र संचालकांनी संघटनेवर विश्वास ठेऊन साथ द्यावी. येणाऱ्या भविष्यकाळात संघटना जिल्ह्यात भरीव काम करून दाखवेल.

               समाधान माने म्हणाले महा ई सेवा केंद्र चालक शासनाच्या प्रत्येक दिशानिर्देश्याचे पालन करून आपल्या केंद्रात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आले आहेत.परंतु नुसते  ई सेवा केंद्र नावाने बोगस ठिकठिकाणी केंद्र चालू केली आहेत ती प्रशासनाने बंद करावीत. तिथे होणारी सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक महा ई सेवा केंद्राच्या माथी मारली जाते. ती थांबवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ही प्रयत्न करणार आहोत.

 या मेळाव्याला सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महा ई सेवा केंद्र आणि आधार केंद्र संचालक उपस्थित होते.

         न्युज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 

       

Post a Comment

0 Comments