Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या मदतीला पोहोचले आमदार मनोज दादा घोरपडे

 शेतकऱ्यांच्या मदतीला पोहोचले आमदार मनोज दादा घोरपडे 

 माजगाव येथील 45 एकर जळीत उसाच्या क्षेत्रची केली प्रत्यक्ष पाहणी 

  वेणेगाव - माजगाव ता सातारा येथील वीज पुरवठ्याच्या तारेतून पडलेल्या ठिणगीतून 45 एकर उसाचे क्षेत्र जाळून खाक झाले.या वेळी  . त्यातील दहा एकरचे ठिबक सुद्धा पूर्णपणे जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याची पाहणी कराड उत्तर चे आमदार मा. मनोज दादा घोरपडे यांनी प्रत्यक्ष माजगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतामधील बांधावर जाऊन केली. यावेळी महावितरणचे विभागीय अभियंता मुलाणी, अतीत अभियंता चव्हाण, बोरगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय परविंद्र तेलतुंबडे , बाजार समिती संचालक ऍड. धनाजी  जाधव, माजगाव चे सरपंच उपसरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

              मिलेल्या माहिती नुसार आमदार मनोज दादा घोरपडे यांनी प्रत्यक्ष झालेले नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामा करून प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्याचे निर्देश दिले. झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना जास्तीतजास्त भरपाई शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच जळीत उसासाठी इतर कारखान्यांना तोडणी देऊन गळीतासाठी ऊस पाठवण्याची व्यवस्था केली. वारंवार शेतकऱ्यांची होत असणारी गैरसोय आणि नुस्कान टाळण्यासाठी सर्व विभागातील डीपी व वितरण व्यवस्था याचे सर्वेक्षण  करून नवीन डीपी व  वितरण व्यवस्था बसवण्यासाठी जिल्हा नियोजन मधील लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन कराड उत्तरचे आमदार माननीय मनोज घोरपडे यांनी दिले. यावेळी सुरेश जाधव पाटील,जयवंत जाधव,मानसिंग जाधव, भास्कर जाधव,दत्तात्रेय जाधव, गोरख जाधव,बाळासाहेब चव्हाण, समाधान जाधव,संताजी जाधव, बबन जाधव, फिरोज मुलाणी,संदीप पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

झालेल्या घटनेने महावितरण अधिकाऱ्यांना आतातरी जागा येणार का?

अतीत सबस्टेशच्या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात काही ठिकाणी पडलेले विजेचे खांब, उघड्या पडलेल्या डीपी, तुटलेल्या तारा यामुळे शेतकऱ्यांना सतत नुकसान सोसावी लागत आहे. मागील काही महिन्यापूर्वी  वेणेगाव येथील चार एकर उसाचे क्षेत्र याच पद्धतीने जळून खाक झाले.मात्र वर्षानुवर्ष एकाच खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या आतीत सब स्टेशनचे अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांना जाग येणार का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे.

    न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 






Post a Comment

0 Comments