Type Here to Get Search Results !

कराड उत्तर मधील औद्योगीकरणाला मिळणार गती - आ. मनोजदादा घोरपडे

 कराड उत्तर मधील औद्योगीकरणाला मिळणार गती - आ. मनोजदादा घोरपडे  .

वेणेगांव -  कराड उत्तर मधील ओगलेवाडी येथील वीरवडे ता कराड या गावांमध्ये असणाऱ्या कुलबर्गी कंपनी, श्री रेफ्रिजरेटर लिमिटेड या कंपनीना आमदार मनोजदादा घोरपडे यांनी भेट दिली दरम्यान त्यांनी सांगितले.

      यावेळी आ. मनोजदादा  घोरपडे पुढे म्हणाले मी एक स्वतः उद्योजक आहे. एखाद्या व्यवसाय उभा करत असताना त्याला ज्या अडचणी येतात याची मला चांगली जाण आहे आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग धंदा उभा केलेला असून हजारो तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळाले आहे. या विभागातील माता भगिनी या ठिकाणी काम करतात.आपला उदरनिर्वाह करत असतात चांगलं काम आपल्या सर्वांच्याहातून उभे राहिले. त्यासाठी आमच्याकडून जेवढी लागेल तेवढी मदत आम्ही आपणास करन्यास तयार आहोत. याच पद्धतीने कराड उत्तर मध्ये अनेक छोटे मोठे उद्योग उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून या तून या विभागातील तरुणांना जागेवरच काम मिळणार असल्याचे ही आ. मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. 

           यावेळी येथील कामगारांच्या समस्या जाणून घेऊन कारखानदारांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या तसेच येणाऱ्या काळामध्ये औद्योगिक वाढ करण्यासाठी असणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्याची ग्वाही  दिली.

 भेटी दरम्यान श्रीधर कुलबर्गी,अनिल कुलबर्गी,अमोल कुलबर्गी,  सचिन कुलबर्गी, सादिक पटेल, चंद्रकांत मदने, रविनाथ शेंडे, राजश्री शेंडे, योगेंद्रसिंग यादव, सागर बाबर, अनिल कुमार घरात, विनायक भोसले, प्रकाश पवार, राजन धोकटे ,सतीश डांगे, शंकर वीर, सागर हाके, मनोहर वीर ,अनिल पोळ, प्रवीण मगर ,सदाशिव पवार, राजू सूर्यवंशी, पितम शिंदे, विशाल शिंदे कंपनीतील कर्मचारी वर्ग व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 




Post a Comment

0 Comments