वेणेगाव येथील माजी सरपंच तातोबा शिंदे यांचे निधन
वेणेगाव - वेणेगांव ता सातारा येथील माजी सरपंच तातोबा महादू शिंदे(पाटील) वय 92 वर्ष यांचे शनिवार दि.18 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.तातोबा शिंदे पाटील यांना आप्पा या नावाने ओळखत असत.ग्रामपंचायत वेणेगाव मध्ये सरपंच म्हणून त्यांनी लोकांभिमुख निर्णय घेतले. काही काळ त्यांनी पोलीस पाटील म्हणून ही काम केले होते. सदैव सामाजिक कामात व्यस्त असणाऱ्या आप्पांचे अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.आप्पांच्या जाण्याचे वेणेगावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ व खरेदी विक्री संघांचे चेअरमन सुनिल काटे देशमुख यांनी दुःख व्यक्त केले.
आप्पांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली नातू असा परिवार आहे

Post a Comment
0 Comments