खोजेवाडी येथील महाराष्ट्र स्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
वेणेगाव - खोजेवाडी ता सातारा येथील महाराष्ट्र हायस्कूल मध्ये ई. 10 वी च्या सन 2008 - 2009 मधील माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एस पाटील तसेच त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी मुख्याध्यापकांनी काही माजी विद्यार्थी पंकज जाधव (युवा उद्योजक) म्हणून ,तर विशाल भोसले ( राष्ट्रीयकृत बँकेत निवड),सुशांत आवळे (आर्मी) मध्ये निवड,सिद्धेश काळे (महाराष्ट्र शासन वायरमेन पदी निवड ). झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार केला या वेळी माजी विद्यार्थी आठवण म्हणून लाऊड स्पीकर बॉक्स तसेच सतरंजी शाळेला भेट स्वरूपात दिल्या.येणाऱ्या काळात शाळेच्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्न माजी विद्यार्थ्याकडून करण्यात येणार असल्याचे यावेळी व्यासपीठावर आठवणींना उजाळा देताना सांगितले. येत्या 2 मार्चला अशाच स्नेह मेळाव्याचे आयोजन केलं असल्याचे बोलताना सांगितले.
न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments