हिंदुत्वाच्या पताका साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाने केले - समता ताई घोरपडे
वेणेगाव - पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओवी प्रमाणे संतसज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो .त्यामुळे माझी वाणी पुण्यसंचय करुण घेण्यासाठी खरंतर आज मी आले आहे. राम कृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्याच्या सातारा कराड तालुक्यातील भजनी मंडळाचा भव्य शाखा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कराड उत्तरचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सुवेद्य पत्नी स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तरच्या अध्यक्षा समता ताई घोरपडे बोलत होत्या.
दि. 19 जानेवारी रोजी श्री गणेश मंगल कार्यालय हेळगाव ता कराड येथे झालेल्या शाखा उद्घाटन सोहळ्यात पुढे बोलताना म्हणाल्या हिंदुत्वाच्या पताका साता समुद्रा पार पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाने केले. कराड उत्तर च्या वारकऱ्यांचे प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडविले जातील असेही पुढे उपस्थिताना आश्वासित केले.यावेळी वारकरी संघांचे अध्यक्ष संस्थापक ह भ प विश्वनाथ महाराज गरगडे,तसेच वारकरी संघातील राज्य अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी तसेच कराड सातारा तालुक्यातील भजनी मंडळ तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments