देशमुख नगर आय डी बी आय बँकेच्या माध्यमातून जि. प.शाळांना साहित्यांचे वितरण
वेणेगाव - आय डी बी आय बँक शाखा देशमुख नगर ता. सातारा यांच्या माध्यमातून सी एस आर फंडातून एक लाख रुपये किमतीच्या साहित्यांचे वितरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख नगर येथे
फत्त्यापूर, लिंबाचीवाडी, जावळवाडी, कामेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना कार्यक्रमा दरम्यान करण्यात आले. यावेळी आयडीबीआय बँकेचे सातारा रिजनल हेड तुषार बोडस, सातारा रीजनल कॉर्डिनेटर विजय अडसूळ, शाखाप्रमुख तुषार सोनार,आदित्य रंजन (SOM), हे प्रमुख अतिथी म्हणून तर देशमुख नगरचे लोकनियुक्त सरपंच संपत देशमुख हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी वाटप करताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुखनगर येथे एक संगणक तीन टेबल, सहा खुर्ची एकूण रुपये 34000, याच बरोबर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळवाडी 32 इंची एलईडी टीव्ही रुपये 16500, तसेच
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी 32 इंची एलईडी टीव्ही रुपये 16500, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्त्यापूर 32 इंची एलईडी टीव्ही रुपये 16500,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी 32 इंची एलईडी टीव्ही रुपये 16500 याप्रमाणे एकूण एक लाख रुपये किमतीच्या आयडीबीआय बँक यांच्या सन 2024 - 25 च्या आर्थिक वर्षातील सीएसआर फंडातून वरील साहित्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आयडीबीआय बँकेतील कर्मचारी किरण देशमुख, सुरज जाधव, अमित केशव
या बरोबर देशमुख नगर लिंबाची वाडी जावळवाडी फत्त्यापूर कामेरी येथील जि प शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments