Type Here to Get Search Results !

टिटवेवाडी परिसरात रानगव्याचे दर्शन. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण

 टिटवेवाडी परिसरात रानगव्याचे दर्शन.

 शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण 

वेणेगाव -  :  टिटवेवाडी तसेच देशमुखनगर नांदगाव रस्त्यालगत पोल्ट्री शेजारील टेकडीवर  मागील तीन दिवसांपूर्वी रानगवा फिरताना दिसून आला आहे. त्याला जनावरे ,प्राणी, मनुष्याचे दर्शन झाल्यानंतर तो इकडून तिकडे धावत सुटतोय. सध्या या रानगव्या पासून कोणालाही धोका नसला तरी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते असे शेतकरी सांगत आहेत शेतात सकाळी कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रानगव्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे शाळू हरभरा गहू काढणी चालू असून शेतकऱ्यांना शेतात जात असताना भीती व चिंता सतावत आहे.या रानगव्याचा वन विभागाने शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

 न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर 





Post a Comment

0 Comments