Type Here to Get Search Results !

म्हसवड शिरताव येथे अवैध वाळू उपसा करणार्‍या एका वर कारवाई

 म्हसवड शिरताव येथे अवैध वाळू उपसा करणार्‍या एका वर कारवाई

7.65 लाखांचा मुद्देमाल जप्त || म्हसवड येथील  पोलीस पथकाची धडक कारवाई

सातारा - म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत म्हसवड पोलिसांनी शिरताव, ता. माण येथे लक्ष्मीआई मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणारे रोडवर अवैध वाळू भरून एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉयली जोडून चोरटी वाहतूक करीत असताना कारवाई केली. यात ट्रॅक्टर, ट्रॉलीसह 7 लाख 65 हजाराचा मु्देमाल जप्त करीत सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे राहणार शिरताव याचेवर गुन्हा दाखला केला.

            म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शिरताव, ता. माण येथे लक्ष्मीआई मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणारे रोडवर अवैध वाळू भरून एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉयली जोडून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना शिरताव गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉलीसह रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली. त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे 1) सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे राहणार शिरताव यांच्यावर म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 201/25 कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर, ट्रॉली, वाळू असा 7 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत. 

      सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, मैना हांगे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, अनिल वाघमोडे, वसीम मुलाणी यांनी केली.


सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे - कारवाई चालूच राहणार

अवैध वाळू उत्खनन अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण प्रभावी कारवायांचा धडाका चालू असून यापुढे देखील अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यांवर अशाच पद्धतीने प्रभावीपणे कारवाई चालू राहणार आहे.






Post a Comment

0 Comments