Type Here to Get Search Results !

पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्याची फसवणूक

 पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्याची फसवणूक

वेणेगाव - पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्याच्या वजनात फसवणूक केली. ही घटना गुरुवारी दि. 26 रोजी सकाळी अपशिंगे (मि ) येथे राहणाऱ्या सौ रंजना तानाजी जाधव (वय 70)  या वेळी घरात एकट्याच होत्या. यावेळी दोन अनोळखी इसम घरा समोर अंगणात आले.चमकविण्याची पावडर घेता का असा बहाणा करून जेष्ठ महिलेस तांब्याचे ताट व जोडणी चमकवून विश्वास संपादन करून जेष्ठ महिलेच्या हातातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन त्या चमकविण्यासाठी कसली तरी पावडर व लाल रंगाचे पाणी टाकून थोड्यावेळाने ते काढून त्यांच्या जवळील हळदीच्या डब्यात घालून परत देत थोड्यावेळाने काढून ठेवा असे सांगून तेथून निघून गेले. त्या नंतर सदरील बांगड्या बाबत शंका आल्याने त्या नागठाणे येथील सोनाराकडे वजन केले असता ते 33 ग्रॅम भरले सदरील दोघांनी जेष्ठ महिलेचे 50 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या घेऊन त्यातील 17 ग्रॅम वितवळून घेउन सदरील महिलेची 102000 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघा अनोळखी इसमा विरोधात बोरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून सदरील तपास पी एस आय कारळे करीत आहेत. . 

न्यूज 24जनसेवक सह संपादक प्रमोद पंचपोर







Post a Comment

0 Comments